जुने जर्सी डिझाईन कीट घालून मैदानावर येणार ऑस्ट्रेलिया टीम

jercy
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या तीन वनडे सामन्यातील शनिवारी होत असलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया टीम नवीन प्रयोग करणार आहे. या दिवशी ही टीम ३३ वर्षापूर्वी म्हणजे ८० च्या दशकात डिझाईन केलेल्या जर्सी कीट घालून मैदानावर उतरणार आहे. १९८६ साली अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध खेळताना हा ड्रेस ऑस्ट्रेलिया टीम ने घातला होता.

त्यावेळी ऑस्ट्रेलिया टीम भारत दौऱ्यावर आली होती आणि ६ वनडे सामन्याची सिरीज खेळली होती. त्यावेळी त्यांनी हिरवा आणि गडद पिवळ्या रंगाची जर्सी वापरली होती. ही मालिका भारताने ३ – २ अशी जिंकली होती आणि एक सामना अनिर्णीत राहिला होता.

आता या दोन संघात होत असलेल्या वन डे सिरीजमधील पहिला सामना शनिवारी सिडने येथे होत असून अन्य दोन सामने अॅडलेड आणि मेलबर्न येथे होणार आहेत. या टीममधील सर्वात वयाने मोठा खेळाडू पीटर सिडल १९८६ साली १ वर्षाचा होता. तो सांगतो त्यावेळी वापरलेल्या जर्सी कीट आम्ही आत्ता पुन्हा वापरणार आहोत याची मजा वाटते आहे.

Leave a Comment