घटस्फोटानंतर मेकेन्झी बेजोस बनेल जगातील सर्वात श्रीमंत महिला

mekensi
अमेझोनचा सीइओ जेफ आणि त्याची पत्नी मेकेन्झी २५ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेत आहेत याची घोषणा बुधवारी केली गेली असून हा घटस्फोट झाला तर मेकेन्झी जगातील सर्वात श्रीमंत महिला बनणार आहे. ५५ वर्षीय जेफ आणि ४८ वर्षीय मेकेन्झी यांचा घटस्फोट जगातील महागडा घटस्फोट ठरणार आहे. अर्थात त्यांच्या संपत्तीचे वाटप अमेरिकन कायद्यानुसार केले गेले तर मेकेन्झी कडे ८४.७६ लाख कोटी म्हणजे ४.७६ लाख कोटी डॉलर्स असतील.

वॉशिंग्टन कायद्यानुसार पती पत्नी याच्यात संपत्तीचे वाटप बरोबरीत होते. जगातील सध्या सर्वात श्रीमंत महिला एलाईस वॉल्टन ही असून तिची संपत्ती आहे ३.२२ लाख कोटी. ती वॉलमार्ट ची वारस आहे. मेकेन्झीची संपत्ती घटस्फोटानंतर ४.७६ लाख कोटी असेल. या यादीत सध्या दोन नंबरवर लोरीयाल या फ्रेंच कंपनीची मालक फ़्रन्कोइस असून तीन नंबरवर जर्मनीच्या बीएमडब्ल्यूची मालक सुसेन क्लेटन आहे.

अर्थात जेफ आणि मेकेन्झीने ते घटस्फोट घेत असले तरी एकत्र परिवार आणि मित्रासारखे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. मेकेन्झी त्यांच्या चॅरीटी संस्थेसाठी काम करणार आहे. त्यामुळे ती जेफ कडून संपत्तीतील वाटा मागणार नाही असे त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगितले जात आहे.

Leave a Comment