या देशात गुन्हेगारांची होते पूजा

criminals
सध्या आर्थिक गर्तेत सापडलेला व्हेनेझुएला देश एका वेगळ्याच प्रथेमुळे चर्चेत आहे. जगभरातील सरकारे गुन्हेगारांना त्याच्या गुन्हाबद्दल शासन करण्यासाठी विविध कायदे करत असली तरी व्हेनेझुएला मध्ये गुन्हेगारांचे एक मंदिर आहे आणि येथे नागरिक येऊन पूजा करतात, संकट निवारण करण्यासाठी प्रार्थना करतात. अर्थात ज्या गुन्हेगारांनी श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत केली त्याच गुन्हेगारांच्या मूर्ती येथे पुजल्या जातात.

सँटोस मॅलेन्ट्रोस असे या मंदिराचे नाव आहे. येथे अश्या गुन्हेगारांच्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून लोक येतात. आपल्या अडचणी सांगतात आणि त्या मूर्तींना या संकटातून सोडवा अशी प्रार्थना करतात. या मूर्तीमध्ये लुई सांचेज नावाचा पूर्वी होऊन गेलेला गुन्हेगार सर्वात पूजनीय आहे. त्याच्या काळात तो बलवान होता आणि अनेक गरजू लोकांना मदत करून त्याने त्यांचे आयुष्य सावरले होते. त्याने कधीच कोणा निष्पपाला त्रास दिला नाही. प्रसिद्ध रॉबिनहूडचा त्याला अवतार मानले जाई. तो श्रीमंतांच्या घरावर दरोडे घालत असे आणि त्यातून गरजू गरिबांना मदत करत असे.