येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला होणाऱ्या परेड मध्ये आर्मी डेअरडेव्हिल्स या मोटारबाईक स्टंट करणाऱ्या पथकात प्रथमच कॅप्टन शिखा सुरी बायकर्स टीम मध्ये सहभागी होत आहे. या पथकात लष्करी इतिहासात प्रथमच लेडी ऑफिसरला जागा मिळाली आहे. यंदाचा ७० वा प्रजासत्ताक दिन देशात साजरा होत असून आत्तापर्यंत आर्मी डेअरडेव्हिल्स पथकाच्या नावावर २४ विक्रम नोंदले गेले आहेत.
प्रजासत्ताक दिनी प्रथमच महिला लष्करी अधिकारी करणार बाईक स्टंट
दरवर्षी १५ जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिवस किंवा आर्मी डे यंदा आणखी एका कारणाने वेगळा ठरला आहे. यंदाच्या ७१ व्या वर्षीच्या परेडमध्ये २३ वर्षाच्या गॅप नंतर आर्मी सर्व्हिस कोरचे पथक परेड मध्ये सामील होत आहे आणि या १४४ जवानांच्या पथकाचे नेतृत्व प्रथ
मच महिला ऑफिसर लेफ्टनंट भावना कस्तुरी करणार आहेत. १९४९ मध्ये फिल्ड मार्शल के. एम करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची कमान स्वीकारली होती. तेव्हापासून १५ जानेवारी हा आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लष्कराच्या विविध रेजिमेंट परेड मध्ये सहभागी होतात आणि शोभा यात्रा काढली जाते.