जूनमध्ये होणार रणबीर आलीयाचा साखरपुडा

ranbiraa
बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. अनेक जणांना त्याचे जोडीदार सापडले आहेत. काही लग्नाच्या चर्चा अजूनही सुरु असतानाचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि स्वीट गर्ल आलिया भट्ट हे गेल्या वर्षापासून डेटिंग करत असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांची मैत्री आता नात्यात बदलत असून येत्या जून मध्ये त्यांचा साखरपुडा होत असल्याची खबर आहे. या दोघांच्या चाहत्यांसाठी ही खुशखबरी आहे.

या दोघांनी नव्या वर्ष्याचे स्वागत न्युयोर्क मध्ये केले होते. येत्या जून मध्ये साखरपुडा आणि डिसेंबर मध्ये विवाह असा त्यांचा सध्याचा विचार आहे. या दोघांच्या कुटुंबीयांनी या नात्याला मान्यता दिली आहे. या दोघांचा ब्रम्हास्त्र सिनेमाचे शुटींग अंतिम टप्प्यात असून तो २० डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आलिया गली बॉय मध्ये रणवीरसिंग सोबत झळकत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment