असे आहे ऑस्ट्रेलियाचे भारतामधील एकदिवसीय सामन्याचे वेळापत्रक

team-india
मुंबई – फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौ-यावर येणार असून ऑस्ट्रेलियन संघ या दौऱ्यात 2 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्याची माहिती देताना बीसीसीआयने गुरुवारी वेळापत्रक जाहीर केले आहे. २४ फेब्रुवारीला बंगळुरु येथून ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होणार असून १३ मार्चला दिल्ली येथे संपणार आहे.


सध्या ऑस्ट्रेलिया दौ-यावर भारतीय संघ आहे. भारतीय संघ हा दौरा संपल्यानंतर न्यूझीलंडला रवाना होणार आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. 10 फेब्रुवारीला भारतीय संघ न्यूझीलंड दौरा संपवून मायदेशी येणार आहे. 24 फेब्रुवारीला बंगळुरु येथे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. तर, 27 फेब्रुवारीला विशाखापट्टणमला दुसरा टी-20 सामना खेळणार आहे.

हैदराबाद येथे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होऊन १३ मार्चला दिल्ली येथे संपणार आहे. हैदराबाद आणि दिल्लीव्यतिरीक्त नागपूर, रांची आणि मोहाली येथेही एकदिवसीय सामने आयोजित होणार आहेत.