क्रिकेटच्या सर्व प्रकारातून ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती

Albie-Morkel
जोहान्सबर्ग – क्रिकेटच्या सर्व प्रकारातून दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अल्बी मॉर्केलने निवृत्ती घेतली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या माध्यमातून ३७ वर्षीय मॉर्केलने ही माहिती दिली. तब्बल २० वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

ट्वीट करताना अल्बी मॉर्केलने लिहिले की, ही क्रिकेटमधून निवृत्त होण्याची योग्य वेळ आहे. माझ्या आयुष्यातील मागील २० वर्ष चांगली गेली. मला या दरम्यान चांगल्या तसेच वाईट गोष्टींचा अनुभव आला. पण खूप मोठी कारकीर्द मला लाभली.

दक्षिण आफ्रिकेकडून अल्बी मॉर्केलने 1 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 50 टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि रायझिंग पुणे सुपरजाएंट संघाचे प्रतिनिधित्व करताना ९१ सामने खेळले आहेत.