लवकरच ‘ठाकरे’च्या मराठी डबिंगबद्दल निर्णय घेणार – संजय राऊत

sanjay-raut
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट येणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच्या प्रेक्षकांनी या चित्रपटातील बाळासाहेबांना देण्यात आलेल्या आवाजामुळे नाराजी व्यक्त केली. सचिन खेडेकरांचा आवाज ‘ठाकरे’च्या मराठी व्हर्जनला देण्यात आला असून बाळासाहेबांच्या आवाजाशी हा आवाज मिळताजुळता नसल्याचे अनेकांनी म्हटल्याने लवकरच आता याबाबत निर्णय घेणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी चित्रपटालादेखील सुरुवातीला नवाजुद्दीनचाच आवाज देण्याचा आमचा प्रयत्न होता. नवाजुद्दीनला यासाठी मराठी बोलायला देखील शिकवण्यात आले. पण तरीही तो त्याच्या आवाजात सफाईदारपणा नव्हता. बाळासाहेबांच्या बोलण्यात जो नेहमीच असायचा. त्यामुळे शेवटी याठिकाणी खेडेकर यांचा आवाज घेतला गेल्याचे राऊत यांनी एका माध्यमाशी बोलताना म्हटले.

नवाजुद्दीनचाच आवाज ‘ठाकरे’च्या हिंदी व्हर्जनसाठी ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण येत्या ३-४ दिवसात मराठीतील आवाजाबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडेच प्रेक्षकांचे लक्ष वेधलेले आहे.

Leave a Comment