नुकताच बाप झालेल्या रोहित शर्माची ऋषभ पंतला नवी ऑफर

rohit-sharma
भारतीय संघाचा विकेट कीपर ऋषभ पंतला नुकताच बाप झालेल्या रोहित शर्माने नवी ऑफर दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमचा कर्णधार टीम पेनची पत्नी बोनी काहीच दिवसांपूर्वी ऋषभ पंतला सर्वोत्तम बेबी सिटर म्हणाली होती. रोहित शर्माने देखील आता त्याची मुलगी समायरासाठी बेबी सिटर होण्याची ऑफर पंतला दिली आहे. रोहित शर्माने गुड मॉर्निंग मित्रांनो… एका चांगल्या बेबी सिटरची गरज आहे. लवकर पाहिजे. ऋषभ पंत हे काम करणार असेल तर रितीकाही खुश होईल, असे ट्विट केले आहे. काहीच दिवसांपूर्वी रितिका सजदेह आणि रोहित शर्मा यांना कन्यारत्न झाले आहे.

रोहित शर्माच्या या ट्विटला ऋषभ पंतने थेट उत्तर न देता यामध्ये युझवेंद्र चहलला मध्ये आणले. चहल त्याचे काम नीट करत नाही का? मला समायराचा बेबी सिटर होणे नक्कीच आवडेल. रितीका सजदेह तुला शुभेच्छा, असे ट्विट ऋषभ पंतने केले होते. रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह आणि युझवेंद्र चहल हे दोघं एकमेकांना ट्विटरवर कायमच ट्रोल करत असतात, त्यामुळे ऋषभ पंतने युझवेंद्र चहलचे नाव घेतले.