रणजी चषक – मध्यप्रदेशचे ७ फलंदाज फोडू शकले नाही भोपळा

ranji
इंदौर – क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ म्हणून ओळखला जातो. यात कधीही काही होऊ शकते, याचीच प्रचिती मध्यप्रदेश विरुद्ध आंध्रप्रदेश या सामन्यात आली. एक अजबच घटना मध्यप्रदेशच्या दुस-या डावात घडली. मध्य प्रदेशचे ७ फलंदाज दुसऱ्या डावात भोपळाही फोडू शकले नाही. त्यामुळे अवघ्या ३५ धावांत संघ सर्वबाद झाला.

आंध्र प्रेदशने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १३२ धावा केल्या होत्या. मध्यप्रदेशने प्रत्युत्तरात ९१ धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात आंध्रने चांगली फलंदाजी करताना ३०१ धावा करत मध्यप्रदेशसमोर ३४३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मध्यप्रदेशची अडखळत सुरुवात झाली.

मध्य प्रदेशच्या संघाची स्थिती १३ षटकात ३ बाद ३५ धावा अशी होती. आंध्र पद्रेशने यानंतर सर्वांना आश्चर्यचकीत करताना मध्यप्रदेशच्या शेवटच्या ७ फलंदाजांना शून्यावर बाद केले. खेळपट्टीवर मध्यप्रदेशचा कोणताही फलंदाज जास्त वेळ टिकू शकला नाही. यश दुबे १६ धावा आणि आर्यमान बिर्ला १२ धावा यांचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

मध्यप्रदेशकडून शशिकांतने चांगली गोलंदाजी करताना सामन्यात ८ षटकांत केवळ १८ धावा देताना ६ गडी बाद केले. तर, पी. विजयकुमारने १७ धावा देताना ३ गडी बाद केले. मध्यप्रदेशचा गौरव यादव दुखापतीमुळे फलंदाजीसाठी आला नाही. त्यामुळे आंध्रने ३०७ धावांनी मोठा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.

Leave a Comment