राज ठाकरेंचा ‘बेस्ट’ कमर्चा-यांना एकी न सोडण्याचा सल्ला

raj-thakre
मुंबई – घर खाली करावे लागणार, या भीतीने परळ बेस्ट बस कर्मचारी वसाहतीमधील कामगार धास्तावले असून बेस्ट कामगारांचा सध्या संप सुरू आहे. पण कामावर या नाहीतर घर खाली करा, अशी नोटीस बजावल्यामुळे कामगार कुटुंबीय एकटवले होते. इमारतीच्या खाली संपूर्ण कुटूंब उतरले आहे. आमदार नितेश राणेही यावेळी पाठबळ देण्यासाठी त्यांच्या भेटीला आले होते.

राज ठाकरे बेस्ट कामगारांसोबतच्या बैठकीत म्हणाले, खासगीकरण करत मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न सुरू असून यांना डेपो विकायचे आहेत. ३५ हजार कोटी मुंबई महापालिकेकडे पडून आहेत. रेल्वेही तोट्यात आहे. मग, ती कशी चालते. पण तुमची एकी तुम्ही सोडू नका. तुमच्या नुसत्या येण्याने आता प्रश्न सुटतील, अशी आशाही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

संपकरी कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याची नोटीस बजावणे म्हणजे कामगारांवर अन्याय असून कामगारांच्या आम्ही पाठिशी उभे आहोत. संपकरी कर्मचाऱ्यांचे कुटुंब असून मुलांचे शिक्षण, घर खर्च, सणवार साजरे करणे हा कर्मचारी आणि कुटुंबाचा अधिकार आहे. हा न्याय हक्कासाठी पुकारलेला संप असून मेस्मा आणि घर खाली करण्याची नोटीस पाठवून कामगारांना भीती दाखवण्याचा प्रयत्न आहे. परंतु कामगारांनी कुठल्याही नोटीशीला न घाबरता कुठलाही अधिकारी बेस्ट वसाहतीत फिरकला तर आम्हाला फोन करा. नंतर बघू अधिकारी घरात कसे राहतात, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

Leave a Comment