राज ठाकरेंनी राहुल गांधींना दिले अमितच्या लग्नाचे निमंत्रण

rahul-gandhi1
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमितच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे. राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यासाठी राज यांच्या वतीने दोन प्रतिनिधी गुप्तपणे दिल्लीत दाखल झाले आहेत.

मोजक्याच व्यक्तींना राज ठाकरे हे मुलगा अमितच्या लग्नाचं निमंत्रण देणार आहेत. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, धनंजय मुंडे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, जयंत पाटील, मिलिंद देवरा, सुधीर मुनगंटीवार यांसारख्या दिग्गज राजकीय नेत्यांना राज ठाकरेंनी अमितच्या लग्नाचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे.