तिसऱ्या दिवशीही बेस्ट कामगार संपावर कायम

best
मुंबई – बेस्ट कर्मचा-यांचा सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संप आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच असून महाव्यवस्थापकांसोबत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे संप सुरूच राहील. बेस्ट कृती समितीच्या शशांक राव यांनी वेळ पडल्यास तुरुंगात जाण्यास तयार असल्याचेही सांगितले.

मेस्मा अंतर्गत ३०० कामगारांवर बेस्टने कारवाईचा बडगा उचलला. प्रशासनाने त्यात थेट बेस्ट कामगारांना घरे खाली करण्याची नोटीस बजावत त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता बेस्टचा संप अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

महाव्यवस्थापकांसोबत बुधवारी संध्याकाळी बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत बेस्ट कृती समितीची बैठक झाली. मात्र. त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. संप बैठक निष्फळ ठरल्यामुळे सुरूच राहणार असल्याचे राव यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, अद्याप बेस्ट प्रशासनाकडून आम्ही सादर केलेल्या मागण्यांवर कोणतीही बाजू मांडण्यात आली नाही. हा लढा कामगारांचा आहे. त्यामुळे कामगारांना विचारल्यावरच प्रशासनाने प्रस्ताव दिल्यास त्यावर निर्णय होईल. या संपाला आणि मुंबईकरांवर ओढवलेल्या या स्थितीसाठी सर्वस्वी शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Leave a Comment