वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोग पाठविणार राहुल गांधींना नोटिस

rahul-gandhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणी साधण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोग (एनसीडब्ल्यू) नोटीस पाठविणार आहे.

“आम्ही उद्या सकाळीच त्यांना पत्र लिहून त्यांच्या वक्तव्याला काय आधार आहे, हे विचारणार आहोत. एक राजकारणी म्हणून ते असे पुरुषवादी वक्तव्य करू शकत नाहीत,”असे एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला सांगितले.

“राहुल गांधी आपल्या पुरुषवादी वक्तव्यातून काय सांगू पाहत आहेत…”एक महिला से कहा रक्षा मेरी किजिए?” महिला दुर्बळ आहेत असे त्यांना वाटते का? सर्वात मोठ्या लोकशाहीच्या एका सुपात्र संरक्षणमंत्र्याला कमजोर व्यक्ती म्हणणे ही विसंगती आहे,असे ट्वीट शर्मा यांनी केले.

राफेल विमान व्यवहारात आपला बचाव करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी एका महिलेला पुढे केले, असे वक्तव्य बुधवारी राहुल गांधी यांनी जयपूर येथे झालेल्या सभेला संबोधित करताना केले होते. गेल्या आठवड्यात लोकसभेत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणावर त्यांचा रोख होता.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांच्यासहित भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती.

Leave a Comment