अमेरिकी अधिकारी पहिल्या दर्जाचे मूर्ख – इराणचे सर्वोच्च नेते

iran
अमेरिकी अधिकारी हे पहिल्या दर्जाचे मूर्ख असल्याची कडवट टीका इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी बुधवारी केली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ हे पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आलेले असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

इराणची धर्मसंसद असलेल्या कौममधील एका गटाशी बोलताना खामेनी यांनी एका अमेरिकी अधिकाऱ्याची कथा सांगितली. या अधिकाऱ्याने आपण तेहरानमध्ये ख्रिसमस साजरा करणार असल्याचे भाकीत केले होते, असे सांगून ते म्हणाले, “काही अमेरिकी अधिकारी ते वेडे असल्याचे भासवतात. अर्थातच मी त्यांच्याशी सहमत नाही, परंतु ते पहिल्या दर्जाचे मूर्ख असतात,” असे ते म्हणाले.

खामेनी यांनी या अधिकाऱ्याचे नाव सांगितले नाही, मात्र अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी गेल्या मार्चमध्ये इराणमधील निर्वासितांचा गट मुजाहिदीन-ए-खलक यांच्या एका बैठकीत हे वक्तव्य केले होते. “इ.स. 201 9 पूर्वी आम्ही इथे… इराणमध्ये साजरा करणार आहोत,” असे ते म्हणाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक वकील आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडी जिओलियानी यांनीही अशी भाकीते केली आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते सर्वसामान्यपणे अशी जोरदार वक्तव्ये करत नाहीत. मात्र गेल्या वर्षी अणु करारातून माघार घेण्याच्या निर्णयानंतर त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

Leave a Comment