पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश म्हणतात – भारतीय कार्यक्रमांमुळे आमच्या संस्कृतीला धोका

pakistan
भारतीय कार्यक्रमांमुळे आमच्या संस्कृतीला नुकसान होते, त्यामुळे पाकिस्तानातील टीव्ही वाहिन्यांवर भारतीय कार्यक्रम दाखवण्याची परवानगी देता येणार नाही, असे मुख्य न्यायाधीश साकीब निसार यांनी बुधवारी सांगितले. त्यानुसार प्रेमी जोडप्यांमधील प्रणयप्रसंग असलेले भारतीय कार्यक्रम दाखवू नयेत, असे

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक चॅनेल नियामक प्राधिकरणाने (पीईएमआरए) दाखल केलेल्या अपीलाची सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती निसार यांनी हे निरीक्षण नोंदविली. पाकिस्तानमधील टीव्ही वाहिन्यांवर भारतीय कार्यक्रम दाखवण्यावरील बंदीला स्थगिती देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पीईएमआरएने हे अपील दाखल केले होते.

फिल्मझिया वाहिनीवर दाखविले जाणारे 65% कार्यक्रम विदेशातील असतात आणि कधी-कधी हे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा जास्त असते, असे पीईएमआरएचे अध्यक्ष सलीम बेग यांनी न्यायालयात सांगितले.

तेव्हा “आम्ही (पाकिस्तानी) वाहिन्यांवर भारतीय कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी देणार नाही,” असे मुख्य न्यायाधीश म्हणाले.
त्यावर “फिल्मझिया ही वृत्तवाहिनी नाही तर मनोरंजन वाहिनी आहे; ते कोणताही प्रचार करीत नाही,” असे पीईएमआरएचे वकील झफर इकबाल कलनौरी यांनी सांगितले.

“मात्र ते आपल्या संस्कृतीला हानीकारक आहे,” असे मुख्य न्यायाधीशांनी उत्तर दिले. त्यानंतर सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थगित करण्यात आली.

पीईएमआरएने 2016 मध्ये स्थानिक टीव्ही आणि एफएम रेडिओ चॅनेलवर भारतीय कार्यक्रम दाखविण्यास संपूर्ण बंदी घातली होती. मात्र लाहोर उच्च न्यायालयाने 2017 मध्ये ही बंदी उठविली होती.

Leave a Comment