अखेर बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर महापौर बंगल्याची जागा

mayor
मुंबई – दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर करण्यात आल्यामुळे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आता लवकरच महापौर बंगला सोडून राणीच्या बागेतीलपर्यायी निवासस्थानी राहायला जावे लागणार आहे. स्मारकाच्या भूमिपुजनाचाही कार्यक्रम महिनाअखेरीसपर्यंत पार पाडण्यात येणार, अशी माहिती देखील समोर आली आहे.

महापौर बंगल्याच्या तळघरात (अंडरग्राऊड) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार असल्यामुळे ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणत्याही प्रकारे तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला असल्यामुळेच या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.

2300 स्वेअर फूट एवढी मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल 9000 स्वेअर फूटांवर पसरलेला असल्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल.

Leave a Comment