२०१९ मध्ये ५ जी चा वापर मर्यादित स्वरुपातच होणार

fiveg
अँड्राईड स्मार्टफोन उत्पादक २०१९ सालात ५ जी आधारित स्मार्टफोनची मॉडेल्स आणण्याची तयारी करत आहेत. त्यात कोरिअन सॅमसंग आणि चीनी हुवाई यांनी आघाडी घेतली असली तरी या वर्षात या हँडसेटची विक्री ५० लाखाच्या दरम्यानच राहील असा अंदाज वर्तविला गेला आहे. या संदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार स्मार्टफोन युजर पैकी फक्त ०.४ टक्के लोकच त्याची खरेदी करू शकतील.

याचे मुख्य कारण असे कि ५ जी साठी आवश्यक सिस्टीम अजून पूर्णपणे तयार झालेली नाही. त्यामुळे या तन्द्रज्ञानाचा व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वापर होण्यासाठी २०२२ साल उजाडेल. काही दिवसांपूर्वी हुवाईने व्होडाफोन आणि आयडीया लिमिटेडच्या सहकार्याने भारतात ५ जी चाचण्या घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत शंका उपस्थित केली होती. त्यामुळे या चाचण्या सुरु होण्यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या शंका दूर केल्या जाणार आहेत असेही समजते.

Leave a Comment