मकरसंक्रांतीला आकाशात रंगणार मोदी- राहुल गांधी युद्ध

kitesmr
मकरसंक्रांती जवळ आली कि वेध लागतात पतंगाचे. या काळात पतंग महोत्सव आयोजित केले जातात आणि असे महोत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गुजराथ राज्यातील बाजार आता विविध रंगी, विविध ढंगी आणि विविध आकाराच्या पतंगानी सजले आहेत. दरवर्षी काही नवी थीम येथे दिसून येते. त्यानुसार यंदा राजकीय आखाडा ही थीम चर्चेत आहे. त्यात मोदी विरुद्ध राहुल गांधी यांना अधिक पसंती मिळत असून मोदी आणि राहुल याची चित्रे असलेल्या पतंगाना मोठी मागणी आहे.

राजकोट बाजारात फेरफटका मारला तर पतंग विक्रीची अनेक दुकाने मालाने भरली असल्याचे दिसत आहे. मोदी, राहुल यांच्या बरोबर अमित शहा आणि गुजराथेतील अन्य नेते पतंगावर दिसत आहेत. जगातील सर्वात मोठा पुतळा ठरलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटीही पतंगावर अवतरला आहे तसेच बाहुबली प्रभास आणि बहुबलीतील अन्य कलाकार यांचेही पतंग आकाशात झेपावणार आहेत.

Leave a Comment