भारताच्या या भागात आहे परग्रहवासियांचा अड्डा

alien
जगभरातून उडत्या तबकड्या अथवा एलीअन म्हणजे परग्रहवासी पाहिल्याचे दावे कित्येक वर्षे केले जात आहेत. एलिअन आहेत असा अनेकांचा विश्वास आहे तसेच पृथ्वीशिवाय अन्य कोठेही जीवसृष्टी नाही असा दावा वैज्ञानिक करत असतात. भारतात मात्र एक जागा अशी आहे, जेथे वारंवार उडत्या तबकड्या दिसतात तसेच तेथील स्थानिक एलिअन दिसत असल्याचे अनेकदा सांगतात.

ufo
लदाखमधील कोंग्का ला हे ते ठिकाण आहे. या संबंधात अनेक कथा येथे ऐकायला आणि पहायलाही मिळतात. येथे मोठ्या संख्येने उडत्या तबकड्या ये जा करतात आणि परग्रहवासी दिसतात असे दावे केले जातात. इतकेच की एलिअन पाहायचे असतील तर या ठिकाणी ते नक्की दिसतील असेही सांगितले जाते. महिन्यातून अनेकदा येथे उडत्या तबकड्या दिसतात असे स्थानिक सांगतात. हा भाग दुर्गम आहे. मात्र तरीही जेथे जे लोक गेले आहेत त्यांनीही उडत्या तबकड्या दिसल्याचे नमूद केले आहे. काही लोकांनी त्याचे फोटो काढले आहेत.

वैज्ञानिकांसाठी सुद्धा या जागेचे रहस्य कायम राहिले आहे. वेळोवेळी अनेक लोक संशोधकांना या संदर्भात माहिती देत असतात इतकेच नव्हे तर गुगलने उपग्रहावरून या जागेत दिसलेल्या रहस्यमयी अंतराळ यानाचा फोटो काढला आहे. जगाच्या नजरेपासून लपलेले काही तरी येथे नक्कीच आहे अशी या जागेची प्रसिद्धी झाली आहे.

Leave a Comment