नमो ब्रांड वस्तूंची ३ महिन्यात ५ कोटींची विक्री

namoagain
तीन महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या नावाने नमो ब्रांडखाली नमो अॅपच्या माध्यमातून विक्रीसाठी आलेल्या वस्तूंच्या विक्रीने ५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून आगामी काळात या वस्तूंच्या विक्रीत आणखी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नमो ब्रांडखाली नमो अगेन नावाने टीशर्ट, टोप्या, कप, किचेन, नोटबुक्स, पेन्स अश्या वस्तू २६ सप्टेंबरला मोदी यांच्या ६८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विक्रीसाठी आणल्या गेल्या होत्या. तीन महिन्यात अश्या १५.७५ लाख वस्तू विकल्या गेल्या असून त्यात जादा खरेदी बीजेपीची प्रादेशिक कार्यालये, बीजेपी कार्यकर्ते यांची आहे. गेल्या महिन्यात पेटीएम व अमेझोनवरही या वस्तू विकल्या गेल्या आहेत.

लोकसभा निवडणुका जवळ येथील तशी या वस्तूंची विक्री अधिक वाढेल असे सांगितले जात असून आत्तापर्यंत सर्वाधिक संख्येने टीशर्ट विकले गेले आहेत. गेल्या तीन महिन्यात २.६४ कोटी टीशर्ट, ५६ लाख टोप्या, ४३ लाख किचेन, ३७ लाख कॉफी मग, ३२ लाख नोटबुक्स आणि ३८ लाख पेन्स विकली गेली आहेत. टीशर्टची किंमत ४९९ रुपये आहे.