अमेझोनचे जेफ आणि मेकेन्झी बेजोस घटस्फोट घेणार

divorcee
जगातील एक नंबर कंपनी ठरलेल्या अमेझोनचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेंझी यांनी २५ वर्षांच्या यशस्वी संसारानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा म्हणजे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून ते परस्पर संमतीने विभक्त होत असल्याचे ट्विटरवर पोस्ट केले आहे.

बुधवारी या संदर्भात ट्विटरवर लिहिताना जेफ आणि मॅकेंझी लिहितात, २५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आणि काही काळ वेगळे राहिल्यानंतर आम्ही आता विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विभक्त होत असल्याने आम्हाच्या नात्याला आता वेगळे नाव मिळेल पण तरीही आम्ही चांगले दोस्त म्हणून राहणार आहोत. या जोडप्याला तीन मुलगे आणि एक मुलगी अशी चार अपत्ये आहेत.

विशेष म्हणजे मॅकेंझी हि अमेझोन मधली पहिली कर्मचारी आहे. तिची जेफशी ओळख डीइ शो मध्ये झाली होती. त्यावेळी जेफ मुलाखती घेत असे. १९९४ मध्ये अमेझोनची स्थापना झाली आणि जेफ आणि मेकेन्झी १९९३ मध्ये विवाहबद्ध झाले होते. मेकेन्झी कादंबरी लेखिका असून तिची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जेफ बेजोस यांची संपत्ती १३७ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

Leave a Comment