महिला काँग्रेसच्या महासचिवपदी पहिल्यांदाच तृतीयपंथीयाची नियुक्ती

transgender
नवी दिल्ली – पहिल्यांदाच एक तृतीयपंथीयाची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अप्सरा रेड्डी असे या नवनियुक्त महासचिवाचे नाव असून, त्या नामांकित पत्रकार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची नियुक्ती केली.

अप्सरा रेड्डी या तृतीयपंथीय असून त्या आपल्या कॉलेज जीवनापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत आल्या आहेत. त्यांनी तामिळनाडूतील बाल लैंगिक शोषणाविरोधातही आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वी अप्सरा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पण, एक महिन्याच्या आतच त्यांनी पक्ष सोडला. भाजप हा प्रतिगामी विचारांचा पक्ष असून तेथे वैयक्तिक मताला काहीही किंमत नसल्याचे त्या म्हणाल्या.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, की त्यांना महिला सक्षमिकरण, सामाजिक न्यायासाठी काम करायचे आहे. महिलांना त्यांचे मानवी अधिकार मिळावे यासाठी त्या प्रयत्न करतील. तसेच, काँग्रेसच्या महिला केंद्रीत राजकारणात सहभागी होतील.

Leave a Comment