नवी दिल्ली – पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) अधिक मजबूत करण्यासाठी चीनने तिबेटमध्ये मोबाईल होवित्झर तोफा तैनात केल्या आहेत. या तोफा सीमेवर सैन्य क्षमता वाढविण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे चीनच्या एका अधिकृत माध्यमाने म्हटले आहे.
तिबेटमध्ये चीनने तैनात केल्या ‘मोबाईल होवित्झर’ तोफा
२०१७ मध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या डोकलाम वादादरम्यानदेखील या मोबाईल होवित्झर तोफा चीनने तिबेटमध्ये तैनात केल्या होत्या. या मोबाईल होवित्झर तोफा तिबेटमध्ये पीएलए तसेच सीमेवरील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत, असे चीनमधील एका सरकारी वृत्त पत्राने म्हटले आहे. चीनमधील मिलट्री एक्सपर्ट सॉन्ग झॉन्गपिंग यांनी यासंदर्भात बोलताना सांगितल्याप्रमाणे, या तोफांची मारक क्षमता ५० किलोमीटरहून अधिक आहे.