थंडी वाजेल म्हणून आंबेडकरांच्या पुतळ्याला बँकेट गुंडळाले

blanket
नवी दिल्ली – सध्याच्या घडीला देशभरात थंडीची लाट आहे. तर उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये एक आकडी तापमान पारा दाखवत आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने या थंडीमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चक्क ब्लँकेट पांघरले आणि त्याच्यासमोर शेकोटी पेटवल्याचा प्रकार मुज्जफरानगर येथील कठैली परिसरात घडला. दरम्यान ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहितीही समोर आली आहे.

हा प्रकार पहाटेच्या सुमारास स्थानिकांना लक्षात आल्यानंतर तक्रार करण्यासाठी त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. काही तासांमध्येच आंबेडकरांच्या पुतळ्यावर बँकेट पांघरणाऱ्याला पोलीसांनी अटक केली. पण तो मनोरुग्ण असल्याचे समोर आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले आहे.

या व्यक्तीला पोलिसांनी अटक करुन चौकशी केली असता मी त्यांच्या पुतळ्याभोवती ब्लँकेट बाबासाहेबांचा पुतळा थंडीत गोठू नये म्हणून पांघरल्याचे सांगितले. मला थंडी वाजत होती. त्यामुळे आंबेडकरांनाही थंडी वाजत असेल असे मला वाटले. मी याच कारणामुळे त्या पुतळ्यावर ब्लँकेट पांघरले आणि त्याच्यासमोर शेकोटी पेटवली, असा जबाब या व्यक्तीने पोलिसांना दिला आहे.