फुटबॉल स्टार रोनाल्डोच्या पुतळ्याचे असेही आकर्षण

ronalstatue
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर आणि जगातील नंबर वन खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याचा त्याच्याच शहरात उभारण्यात आलेला एक पुतळा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला असून या पुताल्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आणि ते फोटो सोशल मिडीयावर शेअर करण्यासाठी पर्यटक एकच गर्दी करताना दिसत आहेत.

रोनाल्डोच्या फुन्चल शहरात संग्रहालयात त्याचा कांस्य धातूपासून बनविलेला ११ फुटी २०१४ साली अनावरण केला गेला आहे. मात्र त्यावेळी हा पुतळा सध्याच्या कारणाने जितका चर्चेत आहे तितका नव्हता. हा पुतळा ज्या जागी आहे तेथे सूर्याच्या थेट किरणांमुळे रोनाल्डोचे आकर्षण वेगळ्याच कारणाने वाढले आहे. या किरणांच्यामुळे या पुतळ्याच्या कमरेखालच्या विशेष बॉडी पार्टवरचा धातू फिकट पडला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचे पहिले लक्ष या जागेवर अपोपाचा वेधले जात आहे.

पुतळा पाहताक्षणी पर्यटकांच्या चेहऱ्यावर प्रथम हसू फुटते आहे आणि नंतर पुताल्यासोबत वेगवेगळ्या पोझ मध्ये सेल्फी घेण्याची होड लागते आहे. असेही समजते की अश्या सेल्फी घेण्यात महिलावर्ग आघाडीवर आहे.

हा पुतळा रिकार्डो वेलोझोने बनविलेला आहे.

Leave a Comment