इंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपद स्पर्धेत

indran
पेप्सिकोच्या माजी सीइओ ६२ वर्षीय इंद्रा नुयी यांचे नाव जागतिक बँकेच्या अध्यक्षपद स्पर्धेत घेतले जात असून अमेरिकन न्यूज वेबसाईट एक्सिओर यावर यासंदर्भात माहिती मंगळवारी दिली गेली आहे.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा जिम यंग किम यांनी सोमवारी अचानक राजीनामा दिला असून त्यांच्या कार्यकाल २०२२ पर्यंत होता. ते १ फेब्रुवारीला पद सोडणार आहेत. इंद्रा नुयी यांची या पदावर नियुक्ती झाली तर त्या पहिल्याच अमेरिकन नसलेल्या अध्यक्ष बनतील. पेप्सिकोच्या सीईओ पदी येणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी होत्या. त्यांनी १२ वर्षे ही जबाबदारी सांभाळताना कंपनीचा महसूल ८१ टक्क्यांनी वाढविला होता.

जागतिक बँक अध्यक्षपदावर आजपर्यत अमेरिकी तर नाणेनिधीच्या अध्यक्षपदी युरोपियन नेमण्याची प्रथा आजपर्यत असून अमेरिका आणि युरोप यांच्यात तसा समझोता झाला असल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांनी नुयी यांना नॉमिनेट केले तर त्याला युरोपियन समर्थन मिळेल. नुयी यांच्याशिवाय जागतिक बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक नोजी आकोन्झा इवीएला व हंगामी अध्यक्ष क्रीस्तीलीना जॉर्जीएवा यांचीही नावे या रेस मध्ये घेतली जात आहेत.

Leave a Comment