या सरोवरातील पाणी ठरेल पृथ्वीवरचे अमृत

clean-water
अँटार्टीका भागात वैज्ञानिकांना एका बर्फाखाली दडलेल्या सरोवरचा शोध लागला असून या सरोवरातील पाणी अतिशुद्ध असल्याचा दावा केला जात आहे. हे पाणी म्हणजे पृथ्वीवरचे अमृत ठरेल असाही दावा केला जात असून हे सरोवर १० वर्षापूर्वी उपग्रहाच्या माध्यमातून पहिले गेले होते मात्र वैज्ञानिकांची टीम येथे नुकतीच पोहोचली. येथे जाण्यासाठी दोन दिवसांचा प्रवास या टीमला करावा लागला. या सरोवरला लेक मर्सर असे नाव दिले गेले आहे.

पृथ्वीचा कानाकोपरा सध्या प्रदूषणाने व्यापला असून प्रदूषण विरोधात मोहिमा चालविण्याची वेळ आली आहे. जेथे स्वास घेणे हेही धोक्याचे बनते आहे तेथे शुद्ध पाणी हि स्वप्नवत बाब बनू पाहते आहे. मात्र वैज्ञानिकांच्या या चमूने शोधलेले लेक मर्सरमधले पाणी जगातील सर्वात शुद्ध असल्याचे दिसून आले आहे. हे सरोवर अमेरिकेच्या मॅनहटनच्या दुप्पट आकाराचे आहे. ते ३५०० फुटांच्या एका हिमखंडाखाली दबलेले होते. अँटार्टीका भागात बर्फाखाली अशी ४०० सरोवरे असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लेक मर्सरपर्यंत पोहोचण्यासाठी बर्फाखाली ड्रील करून हायप्रेशरने बर्फ वितळून रस्ता करावा लागला असेही समजते.

Leave a Comment