ग्रेट वॉल मोटर्सची स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक कार

orar1
चीनी कार उत्पादक ग्रेट वॉल मोटर्सने चीनी बाजारात स्वस्त आणि मस्त तसेच सर्वसामान्य ग्राहकला सहज परवडेल अशी देखणी इलेक्ट्रिक कार ओरा आर १ सादर केली आहे. या कारमध्ये दिलेली फीचर्स खास आहेतच पण त्यामानाने तिची किंमत कमी आहे. हि कार ८६८० डॉलर्स म्हणजे ६ लाख रुपयात मिळणार आहे.
जगभरातील कार उत्पादक कंपन्या प्रदूषण कमी होईल आणि घटत चाललेल्या इंधन साठ्याचा तसेच वाढत्या इंधन किमतीवर उपाय इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणावर विकसित करत आहेत. मात्र या कार पॉवरला कमी असतील अशी भीती आहे तसेच त्या महागही आहेत. ओरा आर वन या बाबतीत सर्व कसोट्यांवर खरी ठरली आहे.

या कारला पॉवरफुल ३५ केडब्ल्यूएच बॅटरी दिली गेली आहे आणि एका चार्ज मध्ये ही कार ३१२ किमी अंतर कापते. ज्यांना रोज कार वापरायची आहे त्यांच्यासाठी ही कार फायदेशीर ठरणार आहे. कारचा लुक आकर्षक आहेच पण तिची फीचर्स खास आहेत. स्टील फ्रेमवर बनविल्या गेलेल्या या कारला कर्व्ज्स आणि मोठे गोल हेडलँप दिले गेले आहेत. कारमध्ये एआय तंत्रज्ञान वापरले गेले आहे त्यामुळे नुसते हॅलो ओरा म्हटले तरी कार सुरु होणार आहे. सध्या फक्त चीन बाजारातच ही कार उपलब्ध असून भारतीय बाजारात ती कधी येणार याची माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment