देशभरातील कामगार संघटना आणि असंघटित कर्मचारी संघटनांचा आज व उद्या देशव्यापी संप

strike
नवी दिल्ली – देशभरातील कामगार संघटना आणि असंघटित कर्मचारी संघटना आज व उद्या खासगीकरणासह कंत्राटीकरणाला विरोध करत संपावर आहेत. संपात सरकारी कार्यालयासह, बेस्टचे कर्मचारी, रिक्षाचालक आणि खासगी क्षेत्रातील कामगार सहभागी होणार असल्यामुळे गैरसोयीचा सामना सर्वसामान्य माणसाला करावा लागणार आहे.

आज व उद्या देशातील विविध संघटीत कामगार संघटना आणि असंघटित कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. सार्वजनिक बँका, अंगणवाडी कर्मचारी, हमाल, बाजार समिती, परिवहन, रिक्षाचालक विमा कंपन्या, पोस्ट, बीएसएनएल, वीज मंडळ आदींचा या संपात सहभाग असणार आहे.

केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रात खासगीकरण व कंत्राटीकरण करण्यात आहे. कोणतीही सुविधा, हक्क व सुरक्षा कंत्राटी कामगारांना मिळत नसल्यामुळे कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. मुंबईमध्ये बेस्ट बसच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना ‘अत्यावश्यक सेवा कायदा’ (मेस्मा) लागू केला आहे. प्रशासनाकडून बेस्ट वर्कर्स युनियनला चर्चेचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार बैठक झाली. परंतु बेस्ट कर्मचाऱ्यांचा हिताचा सकारात्मक विचार न झाल्यामुळे आम्ही संप पुकारणार असल्याचे असे शशांक राव यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, तसेच दरमहा किमान २४ हजार रुपये वेतन मिळावे यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांनी मागणी आहे. देशातील प्रमुख १० बँक कर्मचारी संघटना कामगारविरोधी धोरणांना विरोध करत संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे बँक सेवा विस्कळीत होऊन ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Comment