संजय दत्तच्या बहीणीची लोकसभा निवडणुकीतून माघार

priya-dutt
मुंबई- आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची बहीण आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी घेतला असून प्रिया दत्त यांनी या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांन ईमेल पाठवून लोकसभा निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास प्रिया दत्त यांनी नकार दिला आहे. प्रिया दत्त‍ यांनी दिलेल्या आपल्या निर्णयानंतर या मतदार संघासाठी काँग्रेसने नव्या उमदेवारासाठी चाचपणी सुरु केली आहे. या जागेसाठी सिनेतारकाला उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस विचाराधीन आहे. याबाबत काँग्रेसने हलचाली सुरु केल्या आहेत.

दोनदा खासदार राहिलेल्या प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक न लढविण्यामागे प्रिया दत्त यांनी वैयक्तिक कारण पुढे केले आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे प्रिया दत्त यांनी हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपावरून सहमती झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. दोन्ही पक्ष आपापले 20 उमेदवार मैदानात उतरविणार आहेत. उर्वरित आठ जागा इतर मित्र पक्षासाठी सोडण्यात येणार आहे.