संदीप कुलकर्णीच्या डोंबिवली रिटर्नचे पहिले पोस्टर रिलीज

sandeep-kulkarni
नुकतेच सोशल मीडियाद्वारे आगामी डोंबिवली रिटर्न… जे जाते…तेच परत येते? या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असून प्रेक्षकांना या चित्रपटातून सकस कथानकासह अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल. हा चित्रपट २२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र तेरेदेसाई यांनी केले आहे. अत्यंत लक्षवेधी असे चित्रपटाचे पोस्टर आहे. कारण, कथानकाचा नायक त्याची पत्नी आणि मुलीसह उभा आहे. त्या तिघांच्याही चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थतेचे आहेत. स्वाभाविकच त्यांच्या बाबतीत काय घडले असेल याचे कुतूहल या पोस्टरमधून निर्माण होत आहे.

Leave a Comment