रॉस टेलरने मोडला सचिन, विराटचा विक्रम

trio
न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११५ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने ३-० अशी जिंकली. अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून १३७ धावांची झंझावाती खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.

टेलरने या खेळीसह भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर या दोघांचा विक्रम मोडला. आजची टेलरची खेळी ही त्याची ५०हून अधिक धावांची सलग सहावी खेळी केली. त्याने शेवटच्या सहा डावात नाबाद १८१, ८०, नाबाद ८६, ५४, ९० आणि १३७ अशा धावा केल्याआहेत. त्याने या पराक्रमासह सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला. आपल्या कारकिर्दीत या दोघांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग ५ वेळा ५०हून अधिक धावांची खेळी केली होती. १९९४ साली सचिनने तर २०१२ साली विराटने हा पराक्रम केला होता.

टेलरव्यतिररिक्त हेन्री निकोल्सने १२४ धावांची शानदार शतकी खेळी साकारली. तसेच ५५ धावांची अर्धशतकी खेळी कर्णधार केन विलियम्सन केली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ४ विकेटच्या मोबदल्यात श्रीलंकेसमोर ३६४ धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेचा संघ या आव्हानचा पाठलाग करताना ४१.४ षटकांमध्ये २४९ धावांमध्ये गारद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १४० धावांची वादळी खेळी करून जयसूर्याचा विक्रम मोडणारा थिसारा परेरा याने तिसऱ्या सामन्यातही शानदार ८० धावांची खेळी केली. त्याचबरोबर निक डिकवेला ४६, धनंजया डिसिल्वा ३६ आणि कुसल परेराने ४३ धावा केल्या.

Leave a Comment