राकेश शर्माच्या बायोपिकमध्ये शाहरुख सोबत झळकणार फातिमा सना शेख

fatima-sana-shaikh
अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राकेश शर्माची भूमिका शाहरुख साकारणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. फातिमा सना शेखची या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी वर्णी लागल्याचे बोलले जात आहे.

प्रियंका चोप्रा आणि भूमी पेडणेकर यांची नावे सुरुवातीला चित्रपटाच्या नायिकेसाठी पुढे आली होती. पण याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, फातिमा सना शेख आता या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. यापूर्वी आमिर खानसोबत फातिमाने दोन चित्रपटात भूमिका साकारली आहे. ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातील तिच्या भूमिकांचे कौतुकही झाले होते.


तिने अलिकडेच किंग खानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने व्यक्त केले होते. ती शाहरुखची खूप मोठी चाहती असल्याचेही तिने सांगितले होते. शाहरुख राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी अमेरिकेला प्रशिक्षण घेणार असल्याचेही समजते आहे. तेथे तो अंतराळवीरांचा अभ्यास करणार आहे. राकेश शर्मा बायोपिकचे नाव आधी ‘सॅल्यूट’ ठेवण्यात आले होते. मात्र नंतर हे शीर्षक बदलण्यात आले आहे. आता या बायोपिकचे नाव ‘सारे जहाँ से अच्छा’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान, रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे करणार आहेत.

Leave a Comment