आता ‘या’ कारणासाठी ट्रोल होत आहेत विराट आणि अनुष्का

virat-kohli
नुकतीच ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. इतिहास घडवताना प्रथमच ऑस्ट्रेलियात २-१ ने कसोटी मालिका भारतीय संघाने जिंकली. भारतीय खेळाडूंनी यानंतर ड्रेसिंग रुम आणि मैदानात एकच जल्लोष केला. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील या जल्लोषात सामील झाली होती. परंतु, दोघांनाही कपड्यांवरुन सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.


मैदानात भारतीय संघ जल्लोष करत असताना अनुष्कानेही मैदानात उतरत विजयाचा आनंद साजरा केला. विराट कोहली आणि अनुष्का या दोघांनीही यावेळी पांढरे कपडे घातले होते. परंतु, या दोघांच्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बराच फरक दिसून येत होता. नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल करताना साध्या साबणाने धुतलेली कपडे आणि चांगल्या साबणाने धुतलेली कपडे यातील फरक पाहा अशी उपहासात्मक टीका केली.

Leave a Comment