रोहित शेट्टीच्या आयुष्यातील अजय देवगण सर्वात खास व्यक्ती

rohit-shetty
बॉलिवूडच्या प्रत्येक अॅक्टरच्या विश लिस्टमध्ये एकामागो एक ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन दिग्दर्शक रोहित शेट्टी सहभागी झाला आहे. रोहित शेट्टीने अजय देवगण, शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांच्याबरोबर सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण याबाबत रोहितचे असे म्हणणे आहे, की अजय देवगण त्याच्या आयुष्यात सर्वात खास व्यक्ती असून कुणीही त्याची जागा घेऊ शकत नाही.

रणवीरचा ‘सिम्बा’ प्रदर्शित झाल्यानंतर रोहित शेट्टी आगामी चित्रपटातही रणवीरला घेऊ शकतो, अशी अफवा पसरली होती. तसेच रणवीर आणि अजय यांची तुलनाही केली जात आहे. रोहित यावर म्हणाला, माझ्या लहान भावासारखा रणवीर आहे. पण कुणीही अजयची जागा घेऊ शकत नाही. तो माझा सपोर्ट सिस्टम आहे. मी आज जो काही आहे, ते सर्व अजयमुळेच आहे. माझ्या आयुष्यात त्याची जागा वेगळी आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांच्या जोडीने ८ हिट चित्रपट दिले आहेत. यामधील ५ चित्रपट बॅक टू बॅक हिट ठरले असून १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाले आहेत.