रामाचा जन्म नेमका कुठे झाला? मणिशंकर अय्यर यांनी फोडले वादाला तोंड

manishankar-aiyer
नवी दिल्ली – काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी खूप मोठा असा राजा दशरथाचा महाल होता असे सांगितले जाते. १० हजार खोल्या त्यांच्या महालात होत्या. तिथेच रामाचा जन्म झाला असेल हे कुणाला माहित, असे वक्तव्य केले आहे. आता मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या वतीने आयोजित ‘एक शाम बाबरी मशीद के नाम’ कार्यक्रमात बोलविण्यात आले होते. त्यावेळी अय्यर बोलत होते. राम मंदिर व्हावे ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. आम्हीही म्हणतो की मंदिर जरुर बांधा. पण, आपण म्हणता मंदिर वही बनाएंगे, याला काय अर्थ आहे, असा प्रश्न अय्यर यांनी केला.

अय्यर म्हणाले, की दशरथाचा महाल मोठा होता. यात १० हजार खोल्या होत्या. कुणाला माहित रामाचा जन्म कोणत्या खोलीत झाला. ज्या ठिकाणी मशीद होती तिथेच जन्म झाला असे कसे म्हणता येईल? मशिदीच्या जागेशिवाय कुठेही मंदिर बांधा असे अय्यर म्हणाले. अल्लाहला मानने गुन्हा आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी मणिशंकर अय्यर हे ओळखले जातात. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Leave a Comment