नवी दिल्ली – विदेशातील ६९ शाखा सरकारी बँकांचा तोटा वाढत असल्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांचा यामध्ये समावेश आहे. या शाखा येत्या काही महिन्यात बंद होणार आहेत.
विदेशातील ६९ शाखा बंद करणार भारतीय बँका
सरकारी बँकांच्या विदेशातील २१६ शाखांची गतवर्षी पाहणी करण्यात आली होती. यापैकी ३५ बँकांच्या शाखा बंद करण्यात आल्या आहेत. तर ६९ शाखा बंद करण्यात येणार आहेत. सरकारी बँकांच्या विदेशात ३१ जानेवारी २०१८ पर्यंत १६५ शाखा आहेत.
विदेशात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वात अधिक शाखा आहेत. विदेशात एसबीआयच्या ५२, बँक ऑफ बडोदाच्या ५० तर बँक ऑफ इंडियाच्या २९ शाखा आहेत. एसबीआयच्या इंग्लंडमध्ये ३२, हाँगकाँग आणि दुबईत १३ तर सिंगापूरमध्ये १२ शाखा आहेत. २०१६-२०१७ मध्ये विदेशातील ४१ शाखा एसबीआयने बंद केल्या आहेत. पीएसबी मंथनच्या नोव्हेंबर २०१७ मधील धोरणानुसार सरकारी बँका स्थानिक भागात अधिक लक्ष केंद्रीत करणार आहेत.