टीम इंडियाला बीसीसीआयकडून घसघशीत रोख इनाम

team-india
मुंबई : बीसीसीआयकडून भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 71 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्यांदाच मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाला घसघशीत रोख इनाम जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 2-1 असा विजय साजरा केला. 15 लाख रुपयांचा बोनस या मालिकेत खेळलेल्या टीम इंडियाच्या शिलेदारांना प्रत्येक कसोटीसाठी जाहीर झाला आहे. याचा अर्थ चारही कसोटी सामन्यांमध्ये खेळलेल्या भारतीय खेळाडूंना एकूण 60 लाख रुपयांचा बोनस मिळेल.

तर साडेसात लाख रुपयांचे इनाम भारतीय संघातील राखीव खेळाडूंना प्रत्येक कसोटीसाठी मिळणार आहे. 25 लाख रुपयांचा बोनस भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह विविध प्रशिक्षकांना जाहीर झाला आहे. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना त्यांच्या मानधनाच्या रकमे एवढा बोनस मिळेल.