बॅड चीफ मिनिस्टर – गुगलवर आता केरळच्या मुख्यमंत्र्यांची फजिती

vijayan
जॉर्ज बुश आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर गुगलवर आता केरळच्या मुख्यमंत्र्यांची फजिती होत असून गुगलवर बॅड चीफ मिनिस्टर असे शोधल्यास मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांची विकीपीडिया प्रोफाईल उघडत आहे. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांनी विजयन यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे विजयन यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

विजयन यांच्या पाठीराख्यांनी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली असून त्यात या सर्च रिजल्टची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर या सर्च रिजल्टमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव आणण्यासही ‘कॉम्रेड्स’ना आवाहन करण्यात आले आहे.

साबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून पिनरायी विजयन यांना बदनात करण्याचा प्रयत्न होत आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे असे न्यूज18 वाहिनीने म्हटले आहे.

यापूर्वी गुगलच्या ‘इमेज सर्च’मध्ये ‘टॉप इंडियन क्रिमिनल’ हे शब्द टाकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे समोर येत असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी सोशल मीडियात त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्याही आधी गुगलमध्ये ‘इडियट’ हा शब्द सर्च केल्यास पहिल्या क्रमांकावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे चरित्र येत होते, तर ‘लायर’ हा शब्द सर्च केल्यास ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची माहिती समोर येत असे.

Leave a Comment