अफगानिस्तानमधील सोन्याच्या खाणीत भुस्खलन, ४० जणांचा मृत्यू

gold-maine
अफगानिस्तान – अफगानिस्तानमधील कोहिस्तान जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची घटना घडली असून सोन्याच्या खाणीत गेलेल्या जवळपास ४० लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.

सोन्याचा शोध घेण्यासाठी हे सर्वजण खाणीत गेले होते. त्यावेळी अचानक भूस्खलन झाल्याने हा प्रकार घडला. मृत्यू झालेल्यांपैकी २० जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्याप बेपत्ता लोकांचे शोधकार्य सुरु आहे. घटनेत जीव गमावलेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्याआधीही कोहिस्तान जिल्ह्यात भूस्खलन झाले होते. त्यामध्येही अनेक लोकांचा जीव गेला होता.

Leave a Comment