खासदार राहिलेले 81 वर्षीय नारायण साहू देत आहेत पीएचडीची परीक्षा

narayan-sahu
नवी दिल्ली – या जगातील प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काही न काही शिकत असतो. काहीवेळा पैशांअभावी किंवा परिस्थिती अभावी शिक्षण सोडावे लागते. पण याला काहीजणच अपवाद ठरतात. त्यातच या जगात लग्नानंतर किंवा अगदी 70 व्या वर्षीही पीएचडी किंवा पदवी घेणारे काही जण असतात. सध्याच्या घडीला असेच काहीसे उदाहरण ओडिशामध्ये पाहायला मिळाले आहे. येथील 81 वर्षीय माजी आमदार आणि खासदार राहिलेले नारायण साहू हे सध्या पीएचडीची परीक्षा देत आहेत.

पालहारा येथून नारायण साहू हे दोन वेळेस आमदार झाले असून देवगढ येथील खासदार आहेत. सुरुवातीला साहू यांना राजकारणात रस होता. पण त्यांनी राजकारणातील अनेक चुकीच्या गोष्टी पाहिल्यानंतर राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. साहू यांनी 1963मध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण 2009 मध्ये त्यांनी उत्कल विद्यापीठातून घेतले.

साहू यांनी 2016 पासून पीएचडीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच एक आत्मकथा ही ते लिहीत आहेत. नारायण साहू हे पीएचडी पूर्ण करण्यासाठी सध्या येथील उत्कल विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे साहू सर्वसाधारण रुममध्ये राहतात. त्यामध्ये त्यांच्या बेडवर मच्छरदानी, पुस्तकांनी भरलेले, अभ्यासाच्या साहित्यांनी भरलेले टेबल आणि त्यांच्या कुटुंबियांची काही छायाचित्रेही आहेत.

Leave a Comment