सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असेलेले क्रिकेट स्टेडीयम अहमदाबाद मध्ये

stedium
ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्न येथील क्रिकेट स्टेडियम सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असलेले जगातील सर्वात मोठे स्टेडीयम म्हणून ओळखले जात असले तरी लवकरच त्याची हि ओळख पुसली जाणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडीयम उभारणीचे काम वेगाने सुरु असून स्टॅच्यु ऑफ युनिटी नंतर गुजरातचा शिरपेचात हा दुसरा तुरा खोवला जाणार आहे.

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाथवाणी यांनी या स्टेडीयम बांधकामाचे काही फोटो त्यांच्या ट्विटर अकौंटवर शेअर केले आहेत. भारतात क्रिकेटवेड्यांची संख्या लक्षणीय आहे आणि येथे क्रिकेटशी लोक भावनिक दृष्ट्या इतके जोडलेले असतात कि आपली टीम विजयी झाली तर आतषबाजी करतील आणि हरली तर टीव्ही फोडण्यास कमी करणार नाहीत. त्यामुळे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडीयम या त्यांच्यासाठीही गर्वाचा आणि अभिमानाचा विषय आहे.

या स्टेडियमसाठी ७०० कोटी खर्च केले जात आहेत. यात १.१० लाख प्रेक्षक बसू शकणार आहेत. ६३ एकरात पसारा असलेल्या या स्टेडीयममध्ये ३ सराव मैदाने, क्लब हाउस, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, इनडोअर क्रिकेट अकादमी असून येथे ३ हजार चारचाकी तर १० हजार दुचाकी वाहने पार्क करण्याची सुविधा आहे. २०१७ मध्ये या स्टेडीयमचे काम सुरु झाले असून ते वेगाने पूर्ण केले जात आहे.

Leave a Comment