बॉलीवूडमधील खान तिकडीसाठी गेले वर्ष निराशाजनक

khanaval
गेल्या १२ वर्षात प्रथमच वर्षात सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत खान तिकडी म्हणजे सलमान, आमीर आणि शाहरुख यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या तीन मध्ये आलेला नाही. त्यामुळे गेले वर्ष या तिकडीसाठी फारसे समाधानाचे राहिलेले नाही.

सलमानखानचा रेस ३ गतवर्षात सर्वाधिक ट्रोल झला आणि त्याने अवघा १६६.४० कोटीचा व्यवसाय केला. सलमानच्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत हि कमाई नगण्य आहे. आमीरच्या बहुचर्चित ठग्स ऑफ हिंदोस्तानने १५१.१९ कोटीच्या व्यवसाय केला तर नाताळात आलेल्या शाहरुखच्या झिरोची कमाई ८८.८५ कोटी झाली. गतवर्षात सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले रणबीर कपूरचा संजू (३४२.५३ कोटी), रणवीरचा पद्मावत (३०२.१५ कोटी) आणि सिम्बाची आत्ताची काम्माई १७३.१५ कोटी.

२०१७ मध्ये सलमानचं टायगर जिंदा है ने ३३९.१६ कोटींची कमाई करताना पहिला नंबर मिळविला होता. २०१६ मध्ये आमीरच्या दंगलने ३८७.३८ कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती तर २००७ मध्ये शाहरुखचे ओम शांती ओम आणि चक दे इंडिया आघाडीवर होते.

Leave a Comment