चीनमधले हे खेडे योगग्राम म्हणून आले चर्चेत

yogavi
युगोउलीयांग या उत्तर चीनच्या हेबइ प्रांतातील छोटेसे खेडे जगाच्या नकाशावर चीन मधले योगग्राम म्हणून प्रसिद्धीस आले आहे. वयाच्या ज्या टप्प्यावर माणसाला साध्या साध्या हालचाली करणेही जेथे कठीण जाते येथे या गावातील वृद्ध अगदी सहज शिर्षासनासारखी अवघड आसने सहजी करत आहेत आणि नियमित योगाभ्यासाने त्यांनी आजारपणाला दूर ठेवण्यात यश मिळविले आहे.

yogavi1
या गावात वृद्धांची संख्या जास्त आहे कारण गावातील तरुण नोकरी व्यवसायासाठी शहरातून गेले आहेत. सध्या या गावात साधारण १९३ कुटुंबे राहतात आणि येथील माणसांचे सरासरी वय ६९ वर्षे आहे. येथे थंडी खूप असते आणि वैद्यकीय सुविधा जवळजवळ नाहीतच. त्यामुळे येथे आजारी पडण्याचे प्रमाण वाढू लागले तेव्हा बहुतेक शेती कामे करणाऱ्या येथील लोकांनी योगाभ्यास सुरु केला. आजही रोज सकाळी नियमितपणे सर्व रहिवासी योग करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात लक्षणीय बदल झाला असून आजारांचे प्रमाण एकदम कमी झाले आहे.

या गावाने राष्ट्रीय पातळीवर आरोग्यपूर्ण गाव असा लौकिक मिळविला आहे आणि जगभरात या गावाचे नाव झळकू लागले आहे.

Leave a Comment