रिलायंसचा कुंभ जिओफोनचा धमाका

kumbhjio
प्रयागराज येथे सुरु होत असलेल्या कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर रिलायंस जिओने कुंभ जिओफोन सादर केला आहे. कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना हा फोन एकप्रकारचे वरदान ठरेल असा दावा केला जात आहे.

या फोनवर कुंभ मेळ्याशी संबंधित सर्व छोट्या मोठ्या बातम्या मिळणार आहेत. ट्रेन बसस्टेशन संबंधित सूचना, कोणत्या दिवशी कोणते स्नान, स्पेशल ट्रेन बस प्रवासाच्या वेळा, इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर मिळतीलच पण फॅमिली लोकेटर नावाच्या विशेष अॅपच्या सहाय्याने गर्दीत नातेवाईक चुकले किंवा हरवले तर त्यांचे लोकेशन त्वरित कळणार आहे.

या फोनवर जिओ टीव्ही आहे आणि त्यावर कुंभमेळ्याचे खास पर्व कार्यक्रम व्हिडीओ प्रसारित केले जाणार आहेत तसेच भक्तीसंगीताचा लाभ जिओ रेडीओवर घेता येणार आहे. युट्युब, फेसबुक, व्हॉटस अप या सोशल मिडिया अॅप या फोनवर अगोदरच उपलब्ध आहेत त्यामुळे भाविक याच्या माध्यमातून देश विदेशातील मित्रमंडळी, नातलग यांच्याशी सहज संपर्क करू शकणार आहेत.

हा कुंभ जीओफोन एक्स्चेंज ऑफर सह ५०१ रुपयात मिळणार आहे. कोणत्याची कंपनीच्या कोणताही २,३,४ जी फोन कुंभ जिओ मध्ये बदलता येणार असून संयुक्त ऑफरनुसार अॅक्टीव्हेशनसाठी रिफंडेबल ५०१ रु. तसेच रिचार्ज साठी ५९४ रु. भरावे लागतील त्यात ६ महिने अनलिमिटेड कॉलिंग डेटा मिळणार आहे. शिवाय दररोज हजारो रुपयांचे इनामी व्हाउचर, ४ जी डेटा जिंकण्याची संधी युजरला मिळणार आहे.