या विषारी उद्यानात जाताना सोबत हवा गाईड

poison
एखाद्या इतिहासिक किल्ल्यात, गडावर, मंदिरात, हवेल्यातून जाताना गाईड बरोबर घेणे नेहमीचा ठरते याचा अनुभव आपण घेतो. पण एखाद्या उद्यानात फिरताना गाईडची गरज का भासावी असा प्रश्न पडू शकतो. इंग्लंडच्या नॉर्थांबरलँड येथे असलेल्या एका अनोख्या उद्यानात मात्र असा प्रश्न उपयोगाचा नाही कारण येथे गाईडशिवाय गेलात तर तुमच्या जीवाची खात्री देता येणार नाही. आपल्या जीवावर बेतू नये असे वाटत असेल तर येथे गाईड हवाच.

garden
सुमारे १४ एकरात पसरलेल्या या उद्यानात विविध प्रकारची ७०० हून अधिक विषारी झाडे झुडपे आहेत. त्यामुळे आपली थोडीशी चूक येथे फार महागात पडू शकते. या उद्यानाचे नावच मुली पॉइझन गार्डन असे असून या उद्यानाचा गेटवर गाईडशिवाय आत जाऊन नका असा स्पष्ट इशारा दिला गेला आहे. या उद्यानात फिरताना गाईड या विषारी झाडाझुडपांची माहिती देतो आणि कुठेही स्पर्श करू नका अशी सूचनाही देतो. येथे विषारी झाडांबरोबर विषारी किडे आणि कीटकही आहेत.

प्राचीन काळात इटलीमध्ये पडूआ येथे असे विषारी उद्यान होते आणि त्याचा वापर राजाच्या शत्रूवर विजय मिळविण्यासाठी केला जात असे अशी कथा सांगतात. त्यावरून प्रेरणा घेऊन नोर्थाम्बरलंड च्या राणीने २००५ मध्ये मादक व विषारी झाडांचा हा बगीचा तयार केला. येथील झाडांना अथवा गवताला नुसता स्पर्श झाला तरी ताप चढतो आणि काहीवेळा मृत्यू ओढवतो असे समजते. या उद्यानाच्या गेटवर २४ तास सुरक्षा रक्षक असतो आणि सायंकाळ नंतर आत प्रवेश दिला जात नाही.

Leave a Comment