गुलाबजाम बनला पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई

gulabjamun
स्पर्धेत असलेल्या जिलेबी आणि बर्फी या पदार्थांना मागे टाकून पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई बनण्याचा मान गुलाबजामने मिळविला आहे. राष्ट्रीय मिठाईचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने त्यांच्या ट्विटर अकौंटवर नागरिकांना प्रश्न विचारले होते. देशाची मिठाई म्हणून तुम्ही काय पसंत कराल या प्रश्नाला गुलाबजाम असे उत्तर सर्वाधिक लोकांनी दिले असे समजते.

या पदार्थात जिलेबी आणि बर्फीचा समावेश होता मात्र सर्वाधिक म्हणजे ४७ टक्के मते गुलाबजामला मिळाली. जीलेबिला ३४ तर बर्फीला १९ टक्के मते मिळाली. गुलाबजाम भारत, पाकिस्तान, नेपाल, बांगलादेशात लोकप्रिय पक्वान्न आहे. पाक सरकारच्या या सर्व्हेवर काही नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते सरकारने लोकांची पसंती सरकारी ट्विटर अकौंटवर विचारली. या अकौंटचे फक्त ४ लाख २८ हजार फॉलोअर्स असल्याने सर्व देशवासीयांचे हेच मत असेल असे ठरविणे योग्य नाही.

Leave a Comment