अरे देवा ! २२ कोटींमध्ये विकला गेला २७८ किलोचा मासा

tuna-fish
टोकियो – जपानच्या टोकियोमधील विश्वप्रसिद्ध शुकिजी मासळी बाजारात नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला एक मासा चक्क २२ कोटी रुपये किमतीमध्ये खरेदी करण्यात आला आहे. त्यामध्ये या माशासाठी एका प्रसिद्ध हॉटेलच्या मालकाने तब्बल कोटी रुपये मोजले आहेत.

टूना या लुप्तप्राय माशाचा लिलाव मागच्याच वर्षी स्थापित झालेल्या शुकिजी मासळी बाजारात झाला. जपानच्या उत्तर समुद्र किनाऱ्यावरुन हा मासा पकडण्यात आला आहे. हा मासा २७८ किलोचा असून लिलावामध्ये ३३.३६ कोटी येन मध्ये म्हणजेच २१.५ कोटी रुपयावर लिलाव थांबला. सूशी हॉटेलचा मालक कियोशी किमुरा ही बोली लावणारी व्यक्ती होती.

कियोशी याने यापूर्वीही २०१३च्या एका लिलावामध्ये टूना मासा विकत घेतला होता. त्याला त्यावेळी तब्बल १५ कोटी येन चुकवावे लागले होते. तो तेव्हापासून ‘टूना किंग’ नावाने प्रसिद्ध झाला आहे. यावेळी खरेदी केलेला टूना मासा सर्वोत्तम आहे आणि रुचकर मासा विकत घेण्यास मी यशस्वी ठरलो, असे कियोशीने पत्रकारांना म्हटले.

Leave a Comment