हे आहे रितिका-रोहितच्या मुलीचे नाव

rohit-sharma
इन्स्टाग्रामवर भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला असून त्याचबरोबर त्याने त्याच्यामुलीचे नाव काय ठेवले हेही सांगितले. ३० डिसेंबरला एका गोंडस मुलीला रोहितची पत्नी रितिकाने जन्म दिल्यानंतर रोहित आपल्या मुलीचे नाव काय ठेवणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते.

View this post on Instagram

Baby Samaira ❤️

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on


त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात परत जाण्यापूर्वी त्याच्या मुलीचे नाव ठेवले आहे. समायरा असे रोहितने त्याच्या मुलीचे नाव ठेवले आहे. मुलगी झाल्याचे समजताच रोहित ऑस्ट्रेलियाचा दौरा सोडून बायको आणि मुलीला भेटण्यासाठी मायदेशात परतला होता. तो त्यामुळे सिडनी कसोटीत खेळू शकला नाही.

मुलीने रितिकाच्या हातात हात दिल्याचा फोटो रोहितने काही दिवसांपूर्वी शेअर केला. या जोडप्याने मुलीचे नाव काय ठेवले, याची उत्सुकता सर्वांना होती. रोहित-रितिका यांचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. रोहित एकदिवसीय मालिकेसाठी ८ जानेवारीला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

Leave a Comment